लेह लडाख डायरीज- दिवस तिसरा आणि चौथा
दिवस तिसरा आणि चौथा :
लडाखला येताना मुख्य आकर्षणांपैकी एक होते खारदुंगला पास या जगातल्या हायेस्ट मोटरेबल रोडपैकी एक असणाऱ्या रस्त्याला भेट देणे! बरेचसे बुलेट यात्रेकरू केवळ याचसाठी केला होता अट्टाहास म्हणून या रस्त्याला बायकिंग करायला येतात. ते फोटो बघून फार इच्छा होती एक दिवस आपण पण जावं इथे.
आज आम्हाला नुब्रा व्हॅलीला याच रस्त्याने जायचे होते. तसा हा रस्ता पार सियाचेनपर्यंत जातो.
हिमालयीन रस्ता असल्याने आणि त्यात १८हजार फुटावर हाय अल्टिट्युड सिकनेस बसण्याची शक्यता यामुळे आवश्यक औषध सामग्रीनिशी सकाळी लवकर निघालो. उशिरा निघाल्यास मध्ये आर्मीचे काॅन्व्हाॅय सुरु होऊन थांबून रहावे लागते.
गाडी वळणावळणाचे एकेक लुप ओलांडत जसजशी वर जाऊ लागली तसे देखण्या हिमालयाची अनेक रूपं सामोरी यायला सुरु झाली. त्याचबरोबर धूप होऊन चित्रविचित्र आकार झालेले डोंगर दिसायला लागले. निळे आकाश ,पिवळे डोंगर, मागची शुभ्र हिमशिखरं यांचे सुंदर लँडस्केप . काय बघु न काय नको. समोरच्या डोंगरात वरवर चढणारा रस्ता बारीक खाचेसारखा दिसतो लांबून. साधारण दिड तासाने अनेक लूपमधून गरागरा फिरल्यावर अचानक रस्त्यावर वर्दळ, गर्दी दिसू लागली आणि खारदुंगला पास आल्याचे लक्षात आले.
इथल्या पाटीसमोर फोटो काढण्यापुरतेच उतरायचे होते. भलीमोठी जॅकेट, हातमोजे, कानटोप्या वगैरे चढवून काढलेले आमचे फोटो बघून नंतर कोणाचाही फोटो आपलाच म्हणून खपवता आला असता असे अंमळ वाटून गेले खरे😜
जरासे डोके भणभणले परंतु सुदैवाने बाकी काहीच त्रास न होता पंधरा मिनिटांत तिकडुन निघालोच. आमचा ड्रायव्हर अतोनात काळजी करणारा असल्याने तो आम्ही सर्वांनी कानावर टोपी घातलीये ना, मध्ये मध्ये पाणी पितो आहोत ना सगळ्यावर लक्ष ठेवुन होता. माझं बारीक डोकं दुखल्याने मी कमी पाणी पितेय असा माझ्यावर संशय आला! पण तो म्हणत होता त्यात तथ्य आहे. अनेक वर्ष या रस्त्यावर तो गाडी चालवतोय. लोक फोटो काढण्यासाठी जॅकेट वगैरे काढतात, शाॅर्ट्स घातलेल्या मुली इथे फोटो काढताना दिसतात. याचा त्या उंचीवर शरीरावर परिणाम होतो. फोटोसाठी कायपन अर्थातच नको!
खारदुंगला पुढचा रस्ता बराचसा खडबडीत आहे. भितीदायक अरुंद पण. बाजूने दगडी बर्फाची भिंत. ते बर्फ वितळत रस्त्यावर पाण्याची थारोळी पण असतात. ते ड्रायव्हरवर टेंशन टाकून आजुबाजुला पाहिले की अक्षरशः स्वर्गात असल्याचा भास होतो. सर्वत्र शुभ्र काही जीवघेणे बर्फ. सोनेरी उन्हात चमकणाऱ्या डोंगररांगा.केवळ अप्रतिम. या हिमभुलीतून हळूहळू आपण खाली येतो आणि नुब्रा व्हॅली सुरु होते.
शायोक नदीने बनवलेली ही दरी साधारण ८५किमी पसरलेली आहे. पूर्वीच्या सिल्क रुटवरचे हे अत्यंत महत्त्वाचे खरेदीविक्री केंद्र.
अतिशय नितळ देखण्या हिरव्या रंगाची ही नदी आपल्या बाजूने वाहात असते. इथली राजधानी दिस्किट नावाचे गाव आहे. इथे फ्युचर बुद्धाची प्रचंड मोठी मूर्ती अगदी नेमक्या ठिकाणी शांततेचा संदेश देते आहे. या मूर्तीच्या उजव्या बाजूला काराकोरम पर्वतमाला पसरलेली आहे. समोरचा भाग पाकिस्तानमध्ये आणि अलिकडचा उंचावरचा काराकोरमचा भाग आपल्याकडे आहे. त्यामुळे बुध्द पाकिस्तानकडे तोंड करुन धर्मचक्रमुद्रेत त्या देशला शहाणपणा शिकवायचा प्रयत्न करुन बघतोय!
या दिस्किटपासून पुढचे गाव हुंडरपर्यंत चक्क वाळवंट आहे अगदी वाळूच्या टेकड्या आणि उंटासहीत! फक्त इथला उंट दोन कुबडाचा. बॅक्टरिन कॅमल म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच इथे एकप्रकारची काटेरी झुडुपं सर्वत्र दिसतात. हे सिबकथाॅर्न झुडुप. याची फळं औषधी असतात.
आमचा ह्युंडर कँपमध्ये एक रात्र तंबूनिवास होता . नावाला तंबू पण आत अगदी अटॅच्ड बाथरुमसह सुखसोयीयुक्त तंबू हवाबंद आहेत. इथे फक्त रात्री ७-११एवढीच वीज मिळते. त्यामुळे कालचा दिवस डिजिटल डिटाॅक्स आपोआपच झाले!
संध्याकाळी वाळुवर फिरायला गेलो. इथे उंटावरचे शहाणे बनण्यासाठी रांगेत उभे राहायचा वेडेपणा न करता आजूबाजूचा देखणा परिसर फिरुन आलो. उंटाचा दरवळ म्हणजे काय म्हणता महाराजा😁
उंटांचे तांडेच्या तांडे विचित्र आवाज करत लोकांना हिंडवत होते. एखादे छोटेसे उंट लेकरू आईच्या मागे मागे फिरत फोटो काढणाऱ्यांना पोझ द्यायला थांबायचे! इथेच ATV ride पण करता येते. तिथे गाड्या कमी माणसे फार. ती आज करुन पाहू जाताजाता.
रात्री कँपफायर होते. तिथे मस्त गेम्स झाले. लोकांनी गाणी म्हणून गळे साफ करुन घेतले. अर्थात त्यात अस्मादिक आल्याच! नंतर झिंगाटवर झिंगाट नाचून मंडळ झोपायला गेले तेव्हा मात्र थंडी इतकी वाढली होती की मला रात्रभर झोप लागली नाही.
आज सकाळी एकदाची ATV Ride घडली बुवा बापलेकांना! येताना परत खारदुंगलाला बाय करुन लेहला पोहोचलो आहोत.
जाताजाता ...
या एवढया उंचीवरचे हे उत्तम रस्ते ही बाॅर्डर रोड आॅर्गनायझेशनची कृपा आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या काही घुमट्या हे रस्ते बनवताना कामी आलेल्या सैनिकांच्या आहेत. तिथल्या खडतर बर्फाळ वातावरणात अजूनही या रस्त्यावर सतत काम सुरु असते. रस्त्यावर घाण करताना हात आवरा. तो हात या कामगारांना खाऊ देण्यासाठी नक्की बाहेर काढा. थोड्याशा गोळ्या, बिस्किटं यांनी पण ते खुश होतात. जवळ असू द्याच.
इतक्या उंचीवर विरळ हवामानात आपल्यासाठी झटणार्या आर्मी आणि बाॅर्डर रोड आॅर्गनायझेशनला एक कडक सॅल्यूट

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा