लेह लडाख डायरीज- पहिला दिवस
पहिला दिवस:
लडाखला जायचं खूप दिवसांचे डोक्यात होते. पण मैत्रिणीचा हाय अल्टिट्युड सिकनेस स्वित्झर्लंडला बघून घाबरत होतो. यावेळी म्हंटलं अजून पुढे जमणे कठीण होत जाईल. जाऊयाच. मग काय आजच सकाळी पोहोचलो आहोत लेहला.
चोहोबाजूंनी पसरलेल्या हिमालयो नाम नगाधिराजाच्या शिखरांमधून वाट काढत अलगद विमान लेहला उतरलं आणि क्षणात एका मोठया फ्रिजरमध्ये शिरल्यासारखं वाटलं!
हाॅटेल छान आहे . जवळच एअरपोर्टच्या. आजुबाजुला सफरचंदाच्या आणि जर्दाळूच्या झाडाला मोहर आलाय. बाग छान फुललेली आहे.
आजचा दिवस इथल्या वातावरणाशी रुळवुन घेण्यासाठी विश्रांती दिवस आहे. उरात होते धडधड भारी वाटतंय जरासं. पण ठिक आहे.
आज मात्र खावानु पिवानु मज्जानु लाईफ आहे!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा