पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझी इटलीची भ्रमणगाथा ( भाग -३ )

इमेज
आज आमच्या सहलीचा दुसरा दिवस.इथुन पुढचे दोन दिवस आम्ही नेपल्समध्ये असणार होतो.आज जाताना आधी पाॅम्पे मग सोरेंतो करुन नेपल्सला हाॅटेलला मुक्काम असणार होता. रोम नेपल्स साधारण तीन तासाचं अंतर आहे बसने.सगळा ग्रुप अगदी वेळेत ब्रेकफास्ट करुन हजर होता.या हाॅटेलच्या ब्रेकफास्ट मेनुमध्ये मस्त केक्स होते.चीज केक,आॅरेंज अपसाइड डाऊन,काॅफी केक,पायनॅपल सिरप टाकलेला केक,चाॅकलेट केक बर्याच व्हरायटी होत्या.शिवाय फ्रेशली बेक्ड गरम गरम क्राॅसाँ! सर्व गोष्टींची चव घेऊनच पोट भरलं!आणि भरल्या पोटी बसमध्ये विराजमान झालो. बराच वेळ प्रवास होणार असल्याने आमच्या टुर लिडरने सर्वाना एक एक करुन ओळख करुन घ्यायला बोलावलं.ओळखी सुरु झाल्या आणि कळालं की ग्रुपमध्ये सर्वात जास्त डाॅक्टर्स आहेत! सुरुवातीला प्रत्येक डाॅक्टर अभिमानाने आपली स्पेशालिटी, आवडी इ. सांगत होते .हळुहळु दहा एक डाॅक्टर होऊन गेल्यावर उलट सुरु झालं. गेल्या जन्मीच्या पापाची कबुली दिल्यासारखे एकएक जण ओशाळुन मीही डाॅक्टर आहे सांगु लागले आणि त्यांनी मी डाॅक्टर आहे सांगीतले की बसमध्ये एकच हशा पिकु लागला! आणि अडाॅक्टर लोक पुढे होऊन अभिमानाने मी डाॅक्टर नाही ...

माझी इटलीची भ्रमणगाथा (भाग २)

इमेज
माझी इटलीची भ्रमणगाथा ( भाग २)                              डाॅ. अंजली मरकळे व्हिसा मिळाला आणि खरेदीची एकच धांदल उडाली.थोडेसे गरम कपडे घ्यायचे प्रवासी कंपनीने सुचवले होते.कपडे,बूट अशी खरेदी,क्लिनिकला पेशंट्सची कामं आवरणं यात दहा दिवस उडून गेले. शुक्रवारी पहाटे आमचे टर्कीश एयरलाईनचे विमान अगदी वेळेवर इस्तंबुलला येऊन पोहोचले.पुढे इस्तंबुल रोम असे दोन तासानी विमान बदलून जायचे होते.विमानाबाहेर येऊन बघतो तर विमानतळावर अफाट गर्दी.पिक अवरमधलं डोंबिवली स्टेशन झालं होतं.तिथे गेटपाशी आल्यावर कळलं की पुढची फ्लाईट बेमुदत लेट आहे कारण रोमच्या टर्मिनल तीनला आग लागल्याने कालपासून रोमचा विमानतळ बंद आहे! इस्तंबुलचा विमानतळ आपल्या टी टूच्या पुढे अगदीच यस्टीस्टँड दिसत होता.त्यात गेटवर तौबा गर्दी आणि प्रचंड उकाडा.सतत इकडून तिकडे फिरणारे पांढर्‍या कपड्यातले मक्का यात्रेकरू कुठेही उभे राहून नमाज पढत होते.टर्किश डिलाईट्ची चव घेत परत एकदा आमच्या गेटवर आलो,तर गर्दी अजूनच वाढलेली.या विमानतळावर अतिशय अरूंद पॅसेजेस जायला यायला ठेवलेले आह...

माझी इटलीची भ्रमणगाथा ( भाग -१)

खूप दिवसांपासून युरोप ट्रिप करायचं डोक्यात घोळत होतं.निरनिराळ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या सफरींचे कार्यक्रम बघत होते.तो पंधरा वीस दिवसात अक्खा खंड पहायचा चिवडा काही पसंतीला येईना.मला चित्र,शिल्प,संस्कृती,निसर्ग सगळंच अनुभवायचं होतं.त्यातच मीना प्रभूंचं रोमराज्य वाचण्यात आलं आणि मायकेल अ‍ॅन्जेलो लिओनार्दो बरोबरच अजून काही चित्रकार शिल्पकारांची माहिती झाली.त्यातल्या कार्व्हाज्जीओच्या चित्रांनी तर वेडंच केलं.आणि इटलीला जायचं नक्की केलं. मग ऑनलाईन हॉटेल बुकिंग करू,तिथलीच लोकल ट्रीप बूक करू असे मनात मांडे रचायला सुरुवात केली. माझ्या सख्ख्या मैत्रीणीला प्लॅन सांगितला आणि नवर्‍याला!  मैत्रीण असल्याने ती अर्थातच लगेच तयार झाली,नवर्‍याने मात्र सुट्टी मिळेल का नाही सांगता येत नाही वगैरे रडायला सुरुवात केली.मग मी आलास तर तुझ्यासोबत न आल्यास सुनीता आहेच असं बाणेदारपणे सांगून माझ्या इटलीप्रवास शोधाचा अभ्यास सुरु केला! इटलीबाबत विचारणा केल्यावर जऊन आलेल्या प्रत्येकाने चोर्‍यांची भिती घालायला सुरुवात केली.  ते ऐकुन मला कुठेही कधीही काहीही करायला नाही न म्हणणार्‍या नवर्‍याने(तसं प्रशिक्षण दिलं...