पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जेथे आशियाला युरोप मिळते. इस्तंबूल( भाग ४)

इमेज
 जेथे आशियाला युरोप मिळते. इस्तंबूल (भाग ४)- अंजली मरकळे आज सकाळी लवकर उठून ब्रेकफास्टला हजर झालो कारण आजच्या  दिवशी अनेक गोष्टी बघायचे साधायचे होते. तक्सिम सुट्समध्ये छानपैकी आॅम्लेट ,सब्जेली पिडे आणि तुर्की चाय पिऊन मोर्चा वळवला तक्सिम स्क्वेअर स्टेशनकडे. आजचे पहिले ठिकाण होते सुलेमानिये मशीद. आज नेहमीसारखी फ्युनिक्युलर न घेता मेट्रोने प्रवास करायचा होता. नेहमीचेच इस्तंबूलकार्ट तिथेच रिचार्ज करुन घेतले. आणि डावीकडे येनीकापीच्या M2 मेट्रोकडे दाखवणारा बाण बघत प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. अगदी वेळेत फारशी गर्दी नसणारी मेट्रो आली. आम्ही Vezneciller स्टेशनवर उतरलो. प्रत्येक स्टेशनजवळ कोणते बघण्याचे ठिकाण आहे हे देखील बोर्डवर लिहिलेले असते. त्यामुळे चुकीच्या स्टेशनवर वगैरे आपण जात नाही! उतरून मग बरेच मजले चालून आपण स्टेशनबाहेर येतो. बाहेर आल्यावर नेमके कुठे जावे कळत नाही कारण मशिद समोर दिसत नसते. बाहेरच असणाऱ्या टपरीवर विचारल्यावर त्याने मागे बोट दाखवले! त्यावरून कसे कळावे? मग गुगलबाबाला विचारले. त्याने बरोब्बर सांगितले स्टेशनकडे पाठ केली तर उजव्या हाताला वळून समोर दिसणारा रस्ता वर चढत...

जेथे आशियाला युरोप मिळते. ( इस्तंबूल भाग ३)

इमेज
जेथे आशियाला युरोप मिळते (इस्तंबूल भाग ३)  लेखिका- अंजली मरकळे आज सकाळी लवकर उठायचे ठरवूनच बाहेर पडलो. रात्री परत येताना जवळच्या मार्केटमधून  सोबत ब्रेड बटर केळी घेऊनच आलो होतो. त्यामुळे पटापट रुमवरच नाश्ता केला आणि निघालो. आज घाई करायची होती कारण आजचे पहिलेच ठिकाण होते हजारो वर्षापासून उभे असलेले इस्तंबूलमधले गुलाबी ऐश्वर्य हागिया सोफिया. हे म्युझियम कम चर्च कम मशीद बघायला कमीत कमी तीन तास लागतात.  शिवाय त्याच्या समोरच प्रसिद्ध ब्लु माॅस्क आणि तिच्यामागे इस्तंबूलचे रोमनकालिन अवशेष हिप्पोड्रोम आहेत. नेहमीप्रमाणे तक्सिम काबातास फ्युनिक्युलर आणि काबातासहून T1 ट्राम घेऊन सुलतान अहमेत स्टेशनवर उतरलो. उतरलो की समोरच हागिया सोफिया आणि ब्लु माॅस्क दिसतात.  त्यांच्याकडे तोंड केले की डाव्या हाताला चालत हागिया सोफिया लागते. त्याच्या प्रवेशद्वारावर प्रचंड मोठी रांग. पण हमारे पास म्युझियम पास था ना!  मग रांगेत पुढे जाऊन तो दाखवताच तिळा तिळा दार उघड केल्यासारखे तिथल्या रखवालदाराने आत घेतले. आत परत वैयक्तिक तपासणी अाणि बॅगेचे स्कॅन करावे लागते. ते करुन मग पास दाखवून आपण ह...