पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुणे परिसर भटकंती - भाग १ भाजे लेणी

इमेज
या दिवाळीत अचानकच मळवलीला जाण्याचा योग आला. तिथे गप्पा सुरु असताना भावाने आपण भाजे लेण्यांना पटकन जाऊन येऊ शकतो इथून अशी सुवार्ता दिली. चार वाजत आले होते. दिवाळी असूनही अव्याहत पडणाऱ्या पावसाने जरा उसंत दिली याचा फायदा घेऊन तडक निघालोच. मळवली स्टेशनपासून अगदी जवळच लेण्यांच्या पाय-या सुरू होतात. समोर विसापूर किल्ला आणि लोहगडाची तटबंदी खुणावत राहते. खाली हिरवीगार शेतं देखण्या चित्रात आपल्याला अलगद सामील करत राहतात.  दमछाक होत चढल्याचे सार्थक व्हावे असा देखणा चैत्यगृहाचा नजारा सामोरा येतो. भाजे लेणी महाराष्ट्रातली सगळ्यात पुरातन लेणी.  साधारण इसपूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्म प्रसारासाठी भिक्क्खू सर्वत्र फिरत असत. त्यांना पावसाळ्याचे चार महिने सोडून एका ठिकाणी तीन रात्रीहून जास्त राहण्याची परवानगी नसे. पण पावसाळ्यात त्यांची रहायची पंचाईत होई. म्हणून वर्षाकाळातल्या निवासाची सोय म्हणून बौध्दांनी ठिकठिकाणी विहार बांधले. भाजे लेणी याच काळातली. ती महाराष्ट्रातली आद्य लेणी का याचा पुरावा देणारे कलते खांब फक्त याच चैत्यगृहात बघायला मिळतात. चैत्यगृहाचा भार खांबावर येऊ नये म्...