नेदरलँड्स - वॉलंदाम आणि झांसेस कांस
Keukenhof / क्युकेनहॉफची ट्रिप मस्तं झाली होती. रात्री मित्राच्या घरी येऊन दमलो असतानाही मस्तं गप्पा मारत बसलो त्यामुळे झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायला ही थोडा उशीर झाला :P आवरुन आम्ही प्रथम वॉलंदामला निघालो वाटेत आम्हाला एका फ्लायओव्हरवर नुकतेच उतरलेले केएलएमचे विमान रनवेवर चालताना दिसले. त्या फ्लायओव्हरवरच रनवे असल्यामुळे खालून गाड्या जात आहेत आणि वरुन विमान असे दृश्य दिसत होते. पटकन जमेल तसा मोबाईलमधून फोटो काढला. वॉलंदाम हे एक बंदर आहे. इथे अनेक शेतकरी व मासेमार स्थायिक झाले आहेत. हे बंदर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तिथे अनेक फिशींग बोट्स बघायला मिळतात शिवाय डच लोकांचा पेहरावही बघण्यासारखा असतो. असं म्हणतात तेथील स्थानिक बायका आजही डच पेहराव परिधान करतात. आम्हीसुध्दा डच पेहरावात अनेक फोटो काढले ..ते इथे देत नाहीये ;) छायाचित्र आंजावरुन साभार* वॉलंदामला पोहचेपर्यंत साडेबारा वाजून गेले होते. हवामानही थंड शिवाय थोडे ढगाळ होते. वाटेत अॅमस्टेल बियर मिळणारे दुकान कम कॅफे लागले. अॅमस्टेल बियरला अॅमस्टेल नदीवरुन नाव देण्यात आले. वॉलंदामला येताच समोर दिसते ती सुंदर ...