लेह लडाख डायरीज - दिवस सहावा आणि सातवा
दिवस सहावा आणि सातवा
लडाखमध्ये शिरतानाच आपल्याला ठायी ठायी आर्मीचे अस्तित्व जाणवायला लागते. आपल्याला महाराष्ट्रात राहताना देशाच्या सीमेवर लोक कसे राहतात ,इथले आर्मीचे महत्त्व त्या प्रमाणात जाणवत नाही. देशाच्या सीमावर्ती भागात जीवनरेखेसारखी आर्मी पसरलेली आहे. विशेषतः कारगिलच्या युध्दानंतर एरवी थंडीत खाली येणारी आर्मी आता बारा महिने वास्तव्यात असते. कारगिल हा जम्मू काश्मीर राज्याचा लडाखला जोडलेला विभाग आहे. ही ट्रिप आखताना मला द्रासच्या आॅपरेशन विजय मेमोरियलला भेट द्यायचीच होती. द्रासला राहण्याची सोय नसल्याने कारगिलला राहून द्रासला जाता येते. त्यामुळे पुढचे दोन दिवस कारगिलमय असणार होते.
लेहहून कारगिलला जाणारा रस्ता आपल्या देशातला अती संवेदनशील भाग NH1. आर्मी आणि BRO कृपेने अतिशय मस्त रस्ता पहाडातून खोदलेला आहे. जागोजाग लँडस्लाइड होत असतात. तरीही रस्ता अगदी छान गुळगुळीत.
याच महामार्गावर अनेक सुंदर ठिकाणं लागतात. मुळात रस्ता जातोच थेट हिमालयातल्या पहाडांमधून. त्यामुळे बर्फाच्या टोप्या घातलेले देखणे डोंगर सोबतीला सतत असतातच. लेहहून जवळच पहिले ठिकाण पत्थरसाहिब गुरुद्वारा लागते. इथे एका भल्यामोठ्या दगडावर गुरु नानकांचे रुप सामावलेले आहे अशी श्रध्दा आहे. त्यामुळे अगदी भाविकतेने इकडे या पत्थरसाहिबची पूजा होत असते. गुरुनानक हिमालयात प्रवास करत असताना या जागी येऊन राहिले होते. त्या गावात एक राक्षस माणसं खात असे. गुरु नानकांना त्रास द्यायला त्याने हा मोठा दगड भिरकावला. त्यांना त्रास न होता उलट तो दगड त्यांच्या स्पर्शाने वितळून त्यांची प्रतिमा त्यात उमटली. ते बघून तो राक्षस शरण आला .अशी एक मस्त गोष्ट या ठिकाणामागे आहे. जी अर्थातच लडाखींना मान्य नाही! ते हीच कथा गुरू पद्मसंभवाची म्हणून सांगतात. आपण गोष्ट म्हणून ऐकून घ्यावी. लंगरमधला मस्त गरम चहा प्यावा आणि डोकं टेकवून यावे!
इथून जरासेच पुढे गेले की मॅग्नेटिक हिलचा परिसर येतो. इथे ( म्हणे) वर जाणारी गाडी बंद केली तरी ती ग्रॅव्हिटीने खाली न जाता मॅग्नेटिक इफेक्टमुळे वरच जात राहते. आम्हाला तरी असे काही जाणवले नाही. पण बंडल मारायला बरा एरिआ आहे 😜 इथे बर्याच हिंदी सिनेमांचे शुटिंग झाले आहे . गाईड शहाणा असल्याने तेच महत्त्व जास्त सांगतो!
याच्यापुढे अर्ध्या तासाच्या अंतरावर अतिशय देखणे ठिकाण लागते. निमु नावाच्या ठिकाणी सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम आहे. हिरवी खळाळती सिंधू नदी आणि बर्फिली मातकट झंस्कार नदी इथे पर्वताच्या खिंडीमध्ये एकमेकींना भेटतात. अतिशय सुंदर जागा आहे ही. हीच झंस्कार नदी हिवाळ्यात पूर्ण गोठते. त्यावरून ट्रेक करता येतो. हा चद्दर ट्रेक अगदी प्रख्यात आहे. या संगमाच्या भागात इथे राफ्टिंग करता येते. त्या बर्फगार पाण्यात खळाळत्या नदीतल्या राफ्टिंगचे फोटो बघणे इतकेच आम्ही करु शकलो!
यापुढच्या प्रवासात सिंधू नदी अशीच खळाळत आपल्या सोबत असते. हिमाच्छादित डोंगर जवळ येऊ लागतात. आणि कुठलासा पास जवळ आल्याची जाणीव बोचरी थंडी करुन द्यायला लागते. इथे जवळच लडाखमधली सगळ्यात जुनी अलची माॅनेस्ट्री आहे . या माॅनेस्ट्रीचे विशेष महत्त्व लडाखी लोकांसाठी आहे .कारण त्यांचे महत्त्वाचे गुरु रिंचेन किंवा तिबेटी भाषेत लोत्स्वा म्हणजेच अनुवादक यांनी ही देवळं बांधून घेतलेली आहेत. पूर्वी बुद्धाची सर्व शिकवण ही पाली आणि संस्कृत भाषेत होती. ती तिबेटी भाषेत अनुवाद करुन आणण्याचे काम या गुरु रिंचेननी केले. त्यांनीच काश्मिरहून कारागीर आणुन बुद्धाची मंदिरे पूर्ण लडाखमध्ये आठव्या शतकात बांधली. या मंदिरांची युनिक स्टाईल आहे. हिंदू पध्दतीची चित्रं, मंडला पेंटिंग्ज आणि तीन मजली रचना यावरून ही मंदिरे ओळखता येतात. इथे अवलोकितेश्वर, मैत्रेय आणि मंजुश्री बुद्धाचे तीन मजली पुतळे आहेत. जुन्या लाकडी बांधणीच्या मंदिरात हे पुतळे आहेत. त्यांच्या वस्त्रावर त्या काळातले राहणीमान चितारलेले आहे. भिंतींवर हिंदू पध्दतीची चित्रे अजंठ्याची आठवण देतात.
इथेच गुरू रिंचेन लोत्स्वा यांचे मंदिर देखील आहे. मंदिर परिसरात खूप छान तिबेटन भेटवस्तूंच्या टपर्या आहेत. या मंदिर समूहाच्या मागे जायचा कंटाळा अजिबात करु नये नाहीतर एका अप्रतिम देखाव्याला मुकाल. मागे मोठया पहाडाच्या पार्श्वभूमीवर हिरवीगार सिंधू नदी खळाळत वाहते आहे. अतिशय देखणा अनुभव आहे ते दृश्य. त्या काळातल्या गुरुंनी तपश्चर्येला काय ठिकाण शोधले आहे. त्यांना दाद द्यायलाच हवी!
अलचीनंतर रस्ता हळूहळू वर चढायला लागतो. मग येतो तेरा हजार फुटावर फोतु ला. इथे बर्फवृष्टीच सुरु होती. मग आम्हीही त्या पडत्या बर्फात हात धुवुन का गार करुन घेतलेच. इथे मस्त ताजा ताजा बर्फ पडत होता. त्याचे गोळे फेकुन मारामारी करुन धापा टाकत परत गाडीत येऊन बसलो.
आता समोरचा लँडस्केप वेगळाच दिसायला लागतो. पिवळे मातकट पर्वत, चेटकिणीच्या धुरांड्यासारखे डोंगर सर्वत्र दिसायला लागतात. बघताबघताच एक भाग तर पूर्णपणे पिवळ्या डोंगरांची अढी लावल्यासारखा येतो. या भागाला चंद्रावरच्या जमिनीसारखा दिसतो म्हणून मूनलँड म्हणतात. पूर्वी हे तळे होते. समोरच्या लामायुरुमधल्या गुरुदेवांनी ते पिऊन टाकून इकडे ही चंद्रावर बांधल्यासारखी दिसणारी माॅनेस्ट्री बांधली अशी एक छानशी लोककथाही या भागाशी निगडीत आहे!
लामायुरु हे लडाखमधल्या अत्यंत जुन्या आणि पवित्र स्थानांपैकी एक आहे.इथे बुध्दधर्माची शिकवण देण्याचे काम अजूनही सुरु आहे. जवळपास तीनशे लामा इथे राहतात. मातीच्या कड्याच्या अगदी टोकावर असणारी ही देवळे न पडणे हा पण चमत्कार मानतात इथले लोक. इथले प्रसिद्ध गुरु नारोपांची तपश्चर्येची गुहा इथे आत आहे. तसेच तिबेटी जनांसाठी रिंचेन गुरुंनी अनुवाद केलेले ग्रंथ इथली महत्त्वाची संपत्ती आहे. या नारोपांनी याकवरुन प्रवास करुन सर्वत्र बुद्ध धर्म प्रसार केला. त्यांचा आणि त्यांच्या लाडक्या याकचा स्तूप देखील बाजूलाच आहे.
लामायुरुनंतर कारगिलच्या पाट्या दिसू लागतात. आर्मीचे ट्रक, युनिट्स लागायला सुरुवात होते. खळाळत्या सुरु नदीसोबत आपण तब्बल पाच तासांनी सुंदर कारगिल गाव सामोरे येते. इथले आमचे हाॅटेल फारच देखण्या ठिकाणी आहे. सुरु नदीच्या काठावर, दोन हिमाच्छादित पर्वतांच्या मध्यवर्ती.
इतक्या सुंदर गावाने तीन तीन युद्ध झेलली आहेत याचा मागमूसही दिसत नाही.
आल्या आल्याच इथून लाइन आॅफ कंट्रोल म्हणजेच झिरो पाॅइंट जवळच आहे समजले. उद्या द्रासला जायचे होते. मग काय सगळा थकवा बाजूला टाकून पळत सुटलो गाडीत. कारण सहा वाजून गेलेले. गाडी वळणावळणाचा चढ चढत एका प्रचंड डोंगरावरुन जाते. वर गेल्यावर एका ठिकाणी सगळ्या गाड्या थांबवल्या. इथे समोरच पाकिस्तानी खेडे दिसते. इथूनच पाकिस्तानी सैन्य या कारगिलच्या पहाडांवर हिवाळ्यात चढले. तेव्हा थंडीत दोन्ही देशांची सैन्य खाली उतरत असत. त्याचा फायदा घेऊन पाकडे या पर्वतांवर कब्जा घेऊन बसले. त्यातून पुढे १९९९चे युध्द घडले. त्याबद्दल पुढच्या भागात लिहिनच ...
आज इकडे LOC वर भारतमाता की जय उद्घोष करुन घेतो !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा