लेह लडाख डायरीज - दिवस सातवा
दिवस सातवा
१९९९ च्या हिवाळ्यात द्रासच्या तोलोलिंग पहाडीवर आपल्या पश्मिना मेंढ्या चरायला नेणाऱ्या मेंढपाळांना शस्त्रास्त्र घेऊन वर चढणारी माणसं दिसली. त्यांनी लगोलग ही बातमी आर्मी आॅफिसात जाऊन कळवली. भर हिवाळ्याचे दिवस. दोन्ही देशाचे सैन्य या दिवसात पहाडावरच्या - ४० तापमानापासून बचाव करायला खाली उतरत असे. तसा अलिखित करारच होता. त्यामुळे एवढया थंडीत कोण कशाला मरतंय तिथे असा विचार करुन ही घटना दुर्लक्षित केली गेली. आणि शेजारच्या देशाने पार द्रास ते बटालिक, कारगिल अशा पूर्णपणे पहाडी भागावरच्या सर्व भारतीय पोस्टवर कब्जा मिळवला. सिमला कराराचा भंग करुन आपल्या भागात मोठ्या प्रमाणात गोळाबारुद घेऊन पहाडावर ठाण देऊन बसून पाकि आर्मी जोरदार गोळीबार करु लागली.
आपला NH1 हा हायवे ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा हायवे सियाचेनपर्यंत रसद पोहोचवतो तसेच लेह आणि श्रीनगरला जोडतो असा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. टायगर हिल, द्रास, तोलोलिंग ताब्यात आल्याने पाकिस्तानी आर्मी पहाडावरून थेट हा हायवे कंट्रोल करु शकत होती.
त्यासाठी या भागातल्या पहाडावरच्या पोस्ट परत ताब्यात घेणे यासाठी आर्मीने आॅपरेशन विजय करायचे ठरवले. या युद्धात अनेक जाँबाज सैनिकांनी अभूतपूर्व साहसी युद्ध करुन प्राण पणाला लावून विजयश्री खेचून आणली. या युद्धात कॅप्टन बात्रा, मनोजकुमार पांडे अशा वीरांना मरणोत्तर परमवीरचक्र बहाल केले गेले .या वीरांचे स्मारक अगदी यथार्थ ठिकाणी म्हणजे टायगिर हिल, बात्रा टाॅप च्या समोर, तोलोलिंग पहाडाच्या खाली बांधलेले आहे.
प्रत्येक भारतीयाने इथे जावेच जावे. बावीस तेवीस वर्षाच्या तरण्याबांड जवानांनी देशासाठी केलेल्या त्याग आणि अदम्य साहसाची कहाणी बघावी. तिथल्या त्यांच्या स्मृतीशिळेवर डोके ठेवुन यावे. त्या वातावरणात आपले राष्ट्रगीत गाताना येणारे रोमांच अनुभवावे.
तिथेच या युद्धात वापरल्या गेलेल्या तोफा व इतर लष्करी साहित्य ठेवलेले आहे.
अवघ्या बावीस वर्षाच्या हुतात्मा विजयंत थापरच्या स्मृतीशिळेचे उद्घाटन त्याच्याच माजी सैनिक वडिलांनी केलेले आहे. त्यांचे पत्र वाचताना मुलाला शेवटचा सॅल्यूट ठोकणार्या बापाचे चित्र समोर येते. तिथले फोटो बघून आणि फिल्म बघून डोळ्यात पाणी न येणारे विरळाच.
लडाख किंवा काश्मीरला गेलात तर आपले कर्तव्य समजून इथे द्रासला जाच.
द्रास गावही देखणे आहे. जगातल्या सर्वात जास्त थंड गावांपैकी एक आहे. रस्ता आर्मीकृपेने उत्तम आहे. इथे रहायची सोय नाही. कारगिलला राहून इथे तासाभरात येता येते.
परत येताना कारगिल गावाच्या सीमेवर गोळीबारापासून गावाचा बचाव करण्यासाठी आर्मीने एका रात्रीत बांधलेली भिंत आहे. तिला एक सॅल्यूट मारुन जायला विसरायचं नाही!
जाताजाता ...
आपण एका हुतात्मा स्थळाला भेट देतोय कार्निवलला नाही. इथे डिसेंट कपडे घालुन जाणे !
तसेच कुठल्याही पोझमध्ये सेल्फी घेताना आपण कुठे उभे आहोत याचा सन्मान ठेवणे आवश्यक आहे हो!

![]() |
| टायगर हिल |
जाताजाता ...
आपण एका हुतात्मा स्थळाला भेट देतोय कार्निवलला नाही. इथे डिसेंट कपडे घालुन जाणे !
तसेच कुठल्याही पोझमध्ये सेल्फी घेताना आपण कुठे उभे आहोत याचा सन्मान ठेवणे आवश्यक आहे हो!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा