राणीच्या देशात - व्हिटबी अॅबी - एक विलक्षण अनुभव
मे महिन्याच्या पहिल्या लाँग विकांताला मित्र-परिवारासोबत चार दिवस कॅरावॅन हॉलिडे करुन आले. शेफिल्डपासून अडिच तासाच्या अंतरावर फिली म्हणून कॅरावॅन पार्क आहे तिथे असंख्य स्टॅटिक कॅरावॅन्स, टेंट्स, मोटरहोम्स पार्क करण्याची सुविधा आहे. तर चार दिवसाच्या मुक्कामात जवळपास काय प्रेक्षणीय स्थळे आहेत हे बघायचे ठरवले, जणेकरुन बाहेर फिरणं ही होईल आणि वॅनमध्ये वेळही घालवता येईल. फिलीपासून १०-१५ मिनिटाच्या अंतरावर स्कारबराह बीच आहे त्याचे नॉर्थ बे आणि साऊथ बे असे दोन बीचेस आहेत. तो आमचा आवडता बीच, अनेक वेळा तिथे गेलोय पण नवीन अजून काय बघायचे असे चालले होते. मग फिलीपासून साधारण ३० मिनिटाच्या अंतरावर फ्लॅमबराह नावाची जागा आहे जिथे लाईटहाऊस आणि फ्लॅमबराह हेड बघण्यासारखे आहे. आम्ही तिथे ह्या आधी ही गेलो होतो आणि ह्यावेळेसही जाणार होतोच कारण मैत्रीणीला तिच्या मुलांना लाईटहाऊस टुर करावयाची होती . मग असे ठरले की शुक्रवारी फिली पार्कमध्ये वेळ घालवायचा, शनीवारी व्हिटबी आणि स्कारबराह बीचवर टाईमपास, रविवारी आराम + मस्तं क्रिकेट, उनो खेळायचे, स्वीमींग करायचे आणि सोमवारी फ्लॅमबराह करुन घरी निघायचे. ठरल्याप्रमा...