पोस्ट्स

जानेवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जेथे आशियाला युरोप मिळते. इस्तंबूल (भाग-५)

इमेज
जेथे आशियाला युरोप मिळते. इस्तंबूल (भाग-५) बघता बघता चार दिवस संपत आले. आजची रात्र आणि उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ मिळणार होता. रोज जाता येता तक्सिम स्क्वेअरवरचे हाफिज मुस्तफाचे प्रसिद्ध दुकान दिसत होते. हे प्रसिद्ध आहे विविध प्रकारच्या तुर्की पुडिंग आणि डिलाइट या मिठाईसाठी. त्यामुळे नुसता दहीभात जेवून तडक हाफिजमुस्तफामध्ये आलो. एखादे दुकान प्रसिद्ध असल्याची ग्वाही म्हणजे तिथे नुसते टूरिस्ट नाही तर स्थानिकांची गर्दी पण तितकीच असते. गुलाबी थंडीत निरनिराळ्या मिठायांवर ताव मारत दुकानाबाहेर गर्दी करुन बसलेले लोकच इथल्या अस्सलपणाची पावती देत होते. आणि दुकानाच्या आत तर मिठाईचा स्वर्गच !  निरनिराळी आकर्षक रंगाची पुडिंग शोकेसमध्ये ठेवलेली होती. शिवाय त्यांचे अतिशय आकर्षक मेन्यूकार्ड मिठायांची सचित्र  माहिती देणारे आहे. आम्ही हिरवेगार पिस्ता चाॅकलेट पुडिंग आणि कुनेफे आॅर्डर केले.  कुनेफे हे अतिशय प्रसिद्ध तुर्की डेझर्ट आहे. मोझारेल्लासारखे चिजचे सारण असणारी अतिशय खमंग पेस्ट्री साखरेच्या पाकात घालुन सर्व्ह करतात.वर पिस्त्याचे भुरभुरलेले टाॅपिंग. अतिशय चविष्ट. तुर्कीत कॅलरी ...