पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुणे परिसर भटकंती - भाग १ भाजे लेणी

इमेज
या दिवाळीत अचानकच मळवलीला जाण्याचा योग आला. तिथे गप्पा सुरु असताना भावाने आपण भाजे लेण्यांना पटकन जाऊन येऊ शकतो इथून अशी सुवार्ता दिली. चार वाजत आले होते. दिवाळी असूनही अव्याहत पडणाऱ्या पावसाने जरा उसंत दिली याचा फायदा घेऊन तडक निघालोच. मळवली स्टेशनपासून अगदी जवळच लेण्यांच्या पाय-या सुरू होतात. समोर विसापूर किल्ला आणि लोहगडाची तटबंदी खुणावत राहते. खाली हिरवीगार शेतं देखण्या चित्रात आपल्याला अलगद सामील करत राहतात.  दमछाक होत चढल्याचे सार्थक व्हावे असा देखणा चैत्यगृहाचा नजारा सामोरा येतो. भाजे लेणी महाराष्ट्रातली सगळ्यात पुरातन लेणी.  साधारण इसपूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्म प्रसारासाठी भिक्क्खू सर्वत्र फिरत असत. त्यांना पावसाळ्याचे चार महिने सोडून एका ठिकाणी तीन रात्रीहून जास्त राहण्याची परवानगी नसे. पण पावसाळ्यात त्यांची रहायची पंचाईत होई. म्हणून वर्षाकाळातल्या निवासाची सोय म्हणून बौध्दांनी ठिकठिकाणी विहार बांधले. भाजे लेणी याच काळातली. ती महाराष्ट्रातली आद्य लेणी का याचा पुरावा देणारे कलते खांब फक्त याच चैत्यगृहात बघायला मिळतात. चैत्यगृहाचा भार खांबावर येऊ नये म्...

लेह लडाख डायरीज- दिवस आठवा

इमेज
शेवटचा दिवस! आज आरामाचा दिवस होता. सकाळी हाॅटेलमधून समोरच डोकावणार्या शांती स्तूपाला भेट देऊन आलो. जपानी सहकार्याने बांधलेल्या या स्तूपाच्या टेकडीवरून लेह शहराचा ३६० डिग्री देखावा दिसतो. श्रीनगरच्या शंकराचार्य टेकडीची आठवण येते. डावीकडे खारदुंगलाचा रस्ता बारीक केसासारखा दिसतो. तिथल्या पहाडाची पाच बोटं आता आठ दिवसात ओळखू यायला लागली आहेत. उजवीकडे स्टोक कांगरी शिखर उन्हात लखलखतं आहे. समोरच लेह पॅलेस डोकावतोय. आज शेवटच्या दिवशी माऊंट सिकनेस डोकं वर काढतोय का काय असं डोकं दुखतंय! त्यामुळे चक्क स्तूपाच्या मेडिटेशन सेंटरमध्ये निवांत बसून ॐकाराचा जप करत बसले! यानंतरचे ठिकाण हाॅल आॅफ फेम म्युझियम.  डोकं धरुन बसले होते. जाऊ का नको जाऊ करत. पण गेले आणि ते अप्रतिम म्युझियम बघून गेल्याचे अगदी सार्थक झाले. वेळ काढून जायचे म्युझियम आहे हे. आपल्या सेनेच्या लेह लडाख, कारगील, सियाचेनच्या मोहिमा ,लढाईचा इतिहास याचे अतिशय उत्तम डाॅक्युमेंटेशन फोटो ,पत्र, माहिती पत्रकं, माॅडेल्स असे सर्व माध्यमातून इथे जतन केलेले आहे. लडाखच्या ट्रिपच्या पहिल्या दिवशी जमले तर हे म्युझियम बघावे. म्हणजे लडाखचा...

लेह लडाख डायरीज - दिवस सातवा

इमेज
दिवस सातवा  १९९९ च्या हिवाळ्यात द्रासच्या तोलोलिंग पहाडीवर आपल्या पश्मिना मेंढ्या चरायला नेणाऱ्या मेंढपाळांना शस्त्रास्त्र घेऊन वर चढणारी माणसं दिसली. त्यांनी लगोलग ही बातमी आर्मी आॅफिसात जाऊन कळवली. भर हिवाळ्याचे दिवस. दोन्ही देशाचे सैन्य या दिवसात पहाडावरच्या - ४० तापमानापासून बचाव करायला खाली उतरत असे. तसा अलिखित करारच होता. त्यामुळे एवढया थंडीत कोण कशाला मरतंय तिथे असा विचार करुन ही घटना दुर्लक्षित केली गेली.  आणि शेजारच्या देशाने पार द्रास ते बटालिक, कारगिल अशा पूर्णपणे पहाडी भागावरच्या सर्व भारतीय पोस्टवर कब्जा मिळवला. सिमला कराराचा भंग करुन आपल्या भागात मोठ्या प्रमाणात गोळाबारुद घेऊन  पहाडावर ठाण देऊन बसून पाकि आर्मी जोरदार गोळीबार करु लागली. आपला NH1 हा हायवे ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा हायवे सियाचेनपर्यंत रसद पोहोचवतो तसेच लेह आणि श्रीनगरला जोडतो असा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. टायगर हिल, द्रास, तोलोलिंग ताब्यात आल्याने पाकिस्तानी आर्मी पहाडावरून थेट हा हायवे कंट्रोल करु शकत होती. त्यासाठी या भागातल्या पहाडावरच्या पोस्ट परत ताब्यात घेणे यासाठी ...

लेह लडाख डायरीज - दिवस सहावा आणि सातवा

इमेज
दिवस सहावा आणि सातवा लडाखमध्ये शिरतानाच आपल्याला ठायी ठायी आर्मीचे अस्तित्व जाणवायला लागते.  आपल्याला महाराष्ट्रात राहताना  देशाच्या सीमेवर लोक कसे राहतात ,इथले आर्मीचे महत्त्व त्या प्रमाणात जाणवत नाही. देशाच्या सीमावर्ती भागात जीवनरेखेसारखी आर्मी पसरलेली आहे. विशेषतः कारगिलच्या युध्दानंतर एरवी थंडीत खाली येणारी आर्मी आता बारा महिने वास्तव्यात असते. कारगिल हा जम्मू काश्मीर राज्याचा लडाखला जोडलेला विभाग आहे. ही ट्रिप आखताना मला द्रासच्या आॅपरेशन विजय मेमोरियलला भेट द्यायचीच होती. द्रासला राहण्याची सोय नसल्याने कारगिलला राहून द्रासला जाता येते.  त्यामुळे पुढचे दोन दिवस कारगिलमय असणार होते. लेहहून कारगिलला जाणारा रस्ता आपल्या देशातला अती संवेदनशील भाग NH1.  आर्मी आणि BRO कृपेने अतिशय मस्त रस्ता पहाडातून खोदलेला आहे. जागोजाग लँडस्लाइड होत असतात. तरीही रस्ता अगदी छान गुळगुळीत. याच महामार्गावर अनेक सुंदर ठिकाणं लागतात. मुळात रस्ता जातोच थेट हिमालयातल्या पहाडांमधून. त्यामुळे बर्फाच्या टोप्या घातलेले देखणे डोंगर सोबतीला सतत असतातच.  लेहहून जवळच पहिले ठिकाण पत्थरस...