पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इजिप्त डायरी भाग १

इमेज
 इजिप्त डायरी पुण्याला शिफ्ट झाले तेव्हा पहिले काम गौरी देशपांडे अनुवादित अरेबियन नाईट्सचे सर्व खंड विकत घेऊन आले होते. त्यांच्या पहिल्याच भागात एक संवाद आहे,' ज्याने कैरो पाहिले नाही त्याने जग पाहिले नाही. जिथली धूळ सोन्याची, नाईल नवलाची आणि नारी अप्सरा. ती नगरी स्वर्गाची आई आहे! ' पिरॅमिड इथले दुसरे आकर्षण. लहान असल्यापासून जगातली सात आश्चर्य बघायचे माझे स्वप्न आहे. त्यातले पहिले पिरॅमिड. हजारो वर्षांपासून जगाला कोडी घालणारी अनेक मंदिरं ,कबरी ,ममीज,खजिने अशा अद्भुत, चमत्कारिक गोष्टी असणारा हा मस्त्र देश बघायचाच होता. गेले कित्येक महिने याबद्दल नुसते वाचतेच आहे. शेवटी आज कैरोमध्ये येऊन पोहोचले एकदाची.   प्रचंड ट्रॅफिकमधुन इंच इंच लढवत एअरपोर्टवरुन हाॅटेलवर येऊन पोहोचलो. चौतिसाव्या मजल्यावर रुम आहे. रुमचा दरवाजा उघडला आणि समोर नाईल! अशी अगदी अंगणात भेटेल वाटले नव्हते. आत्ता कैरोमध्ये प्रचंड गार वारा आणि थंडी आहे. हातात गरम काॅफी आणि समोर अफाट पसरलेले कैरो आणि खाली  डौलदारपणे पहुडलेली नाईल आहे.  अगदी पुढ्यात कैरो टाॅवर आहे. उजव्या बाजूला ताहरिर चौक आणि इजिप्शियन ...