माझी इटलीची भ्रमणगाथा (भाग -१०)
बघताबघता आमच्या सहलीचे आठ दिवस उडून गेले. आता वेध लागले होते व्हेनिसचे. इटलीला येण्याआधी प्रत्येक जण मी व्हेनिसला जाणारेना याची चौकशी जरूर करत असे. काहींनी तर व्हेनिस शिवाय इटलीत पाहण्यासारखं काय असंही विचारलं होतं! जगातलं सर्वाधिक पर्यटक खेचणारं पर्यटन स्थळ म्हणून व्हेनिस ख्यातनाम आहे. हे सर्व वाचून ऐकून कधी एकदा बघणार व्हेनिस असं झालेलं! खुद्द व्हेनिस बेटावर हॉटेल्स अतिशय महाग आहेत. त्यामुळे जवळच्या उपनगरात एका छानशा होटेलात आम्ही उतरलो होतो.अनेक खोल्या असलेल्या या होटेलला लिफ्ट मात्र एकच होती ! त्यात बस भरून भरून चिनी लोक येत होते. त्यातले काही, लोक वाट बघत थांबले आहेत बघूनसुद्धा लिफ्ट हाताने थांबवून फोटो घेणे वगैरे चाळे करत होते. यात आबालवृद्ध सामील ! काय बोलावे... बर्याच प्रतिक्षेनंतर आम्ही सामानासकट रूमवर पोहोचलो. दर वेळी रूम ताब्यात घेण्याआधी तिथली सर्व उपकरणं चालू अवस्थेत आहेत का मोडलेली हे बघत जा असे आम्हाला निक्षून बजावलेले होते. कारण रूम सोडताना हेयर ड्रायर वगैरे मोडलेले आढळल्यास आपल्याला त्याचा खर्च भरून द्यावा लागतो. त्याप्रमाणे बाथरूम चेक करायला गेले आणि "तो...