पुणे परिसर भटकंती - भाग १ भाजे लेणी
या दिवाळीत अचानकच मळवलीला जाण्याचा योग आला. तिथे गप्पा सुरु असताना भावाने आपण भाजे लेण्यांना पटकन जाऊन येऊ शकतो इथून अशी सुवार्ता दिली. चार वाजत आले होते. दिवाळी असूनही अव्याहत पडणाऱ्या पावसाने जरा उसंत दिली याचा फायदा घेऊन तडक निघालोच. मळवली स्टेशनपासून अगदी जवळच लेण्यांच्या पाय-या सुरू होतात. समोर विसापूर किल्ला आणि लोहगडाची तटबंदी खुणावत राहते. खाली हिरवीगार शेतं देखण्या चित्रात आपल्याला अलगद सामील करत राहतात. दमछाक होत चढल्याचे सार्थक व्हावे असा देखणा चैत्यगृहाचा नजारा सामोरा
येतो.
भाजे लेणी महाराष्ट्रातली सगळ्यात पुरातन लेणी. साधारण इसपूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्म प्रसारासाठी भिक्क्खू सर्वत्र फिरत असत. त्यांना पावसाळ्याचे चार महिने सोडून एका ठिकाणी तीन रात्रीहून जास्त राहण्याची परवानगी नसे. पण पावसाळ्यात त्यांची रहायची पंचाईत होई. म्हणून वर्षाकाळातल्या निवासाची सोय म्हणून बौध्दांनी ठिकठिकाणी विहार बांधले. भाजे लेणी याच काळातली. ती महाराष्ट्रातली आद्य लेणी का याचा पुरावा देणारे कलते खांब फक्त याच चैत्यगृहात बघायला मिळतात. चैत्यगृहाचा भार खांबावर येऊ नये म्हणून खांब कलते कोरलेले आहेत. तद्नंतर मात्र दगडात कोरलेले खांब काही भाराने वाकणार नाहीत हे लक्षात आल्यापासून सरळ खांब असणारी लेणी इतरत्र कोरली गेली आहेत. साधारणपणे बावीसशे वर्ष ही लेणी इकडे इतिहास सांभाळत उभी आहेत.
पायर्या चढून वर येताच समोर पिंपळ पानाकृती देखणे चैत्यगृह आणि पुढच्या एकवीस विहारांचा नजारा सामोरा येतो.
सहा वाजता बंद होणार असल्यामुळे प्रथम शेवटच्या गुंफेपासून लेणी बघायला सुरूवात केली.
शेवटचे लेणे सूर्यगुंफा नावाने ओळखले जाते. १८७९ साली इंग्रजांनी केलेल्या साफसफाईत हे लेणे उघडकीला आले. हे लेणे जरी विहारच असला तरी बाहेरच्या भितींवर असणाऱ्या अजोड शिल्पकलेमुळे विख्यात आहे. एक मोकळा व्हरांडा आणि आत खोल्या असे स्वरूप आहे. खोल्या आता कडीकुलूपात बंदिस्त आहेत. पण आपल्याला बाहेरच बघायचे आहे. आपल्या डावीकडे सूर्य आणि उजवीकडे गजारुढ इंद्र अशी ही शिल्प कोरलेली आहेत.
डावीकडच्या चित्रात चार घोड्यांच्या रथात सूर्य बसला आहे. त्याच्या मागे त्याच्या दासी किंवा पत्नी संज्ञा आणि छाया या छत्र चामर ढाळत आहेत. रथाखाली सूर्याचा शत्रू राहू हा असूर चिरडला जात आहे. असूराचे पाय वाकडे आहेत. हेच चित्र बुध्दाचा शत्रू मार याचा वध म्हणूनही ओळखले जाते.
उजवीकडील चित्रात गळ्यात माळा घातलेला इंद्र गजावर स्वार आहे. त्याच्या हातात अंकुश आहे. मागे सेवक पताका घेऊन उभा आहे.
शिल्पाखाली अनेक वादक, नर्तक, प्राणी गण या मिरवणुकीत सामील दिसत आहेत. इथेच एक तबला वाजवणार्या वादकाचे शिल्प दिसते. दोन हजार वर्षापूर्वीदेखिल आपल्याकडे तबला हे वाद्य वादन प्रचलित होते याचा हा मोठा पुरावा मानला जातो.
या शिल्पांच्या समोर एका खांबाच्या टोकाला ग्रीक पुराणातील अर्धे शरीर मानवाचे अर्धे प्राण्याचे असणाऱ्या सेंटाॅरचे शिल्प तसेच खाली पट्टिकेवर पंख असणारे घोडे दिसतात. त्या काळात समुद्र मार्गे ग्रीकांशी असणाऱ्या व्यापार संबंधाचा हा एक पुरावाच इथे कोरलेला आहे.
इथले व्दारपालाचे शिल्प देखील प्रेक्षणीय आहे.
इथून पुढे आलो की चौदा स्तूपांची मालिका सामोरी येते. त्या काळातल्या प्रसिद्ध अशा काही भिक्खुंच्या निधनानंतर त्यांच्या अवशेषांवर हे स्तूप बांधले गेलेले आहेत. काही स्तुपांवर त्यांची नावे देखील कोरलेली आढळतात.
इथे भिक्खू राहात असल्याने पाण्याची अत्यावश्यक सोय टाकी खोदून केलेली आहे. चैत्यगृहाकडे जाताना उजवीकडे थंडगार पाणी असणारी दोन टाकी दिसतात. तिथे वर शिलालेख आढळतो.
"महारठी कोसिकीपुत विण्हुदत दानं"
महाश्रेष्ठी कोसिकीपुत्र विण्हुदत्त याने हे टाके खोदलेले आहेत. या श्रेष्ठी शब्दावरुन आजचा शेठजी शब्द आलेला आहे.
टाक्यावरून पुढे येताच समोर देखण्या चैत्यगृहाचा मनोरम पसारा दिसतो. दुमजली विहार, द्वारावरची यक्षिणी, दगडात कोरलेली जाळीदार गवाक्षे,सज्जे सगळेच अतिशय सुबक आणि सुंदर.
आता मुख्य चैत्यगृहात चपला काढून शिरलो. इथली चैत्यकमान पिंपळाकृती अप्रतिम सुंदर कामाचा नमुनाच.
आतमध्ये कलत्या खाबांनी तोलून घेतलेले छत लाकडी अर्धवर्तुळाकार तुळयांनी बनवलेले आहे. हे लाकूड २२०० वर्ष तसेच टिकून आहे. टोकाला अतिशय गुळगुळीत झिलईकाम असलेला स्तूप आहे. स्तूपावर हर्मिका आहे.
जमिनीवर ठिकठिकाणी गुळगुळीत भोकं दिसतात. ती बहुधा आजच्या दानपेट्या असतात तशा प्रकारची असावीत. तुकतुकीत खांबांवर अनेक ठिकाणी शुभचिन्हे कोरलेली आहेत. एका खांबावर कमळ, चक्र आणि खुंटीला टांगलेला हार अती सुबकपणे कोरलेला दिसतो.
बाहेरच्या बाजूला पाय-या चढून दुमजली विहारांमध्ये जाता येते. इथल्या खोल्यामध्ये झोपायचे दगडी बाक, कुठे सामान ठेवायचे झरोके असे सगळे दगडात कोरलेले आहे.
सगळे बघताना भारावून जायला होते. आपल्या पूर्वजांच्या कामगिरीला मनोमन दंडवत घालून परतीच्या प्रवासाला निघालो खरे पण शिल्पांनी मनावर केलेलं गारुडअजून ओसरतेच आहे....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा