नेदरलँड्स - Keukenhof / क्युकेनहॉफ

 कहाँ आ गये हम, यूं ही साथ साथ चलते....ह्या गाण्यात ट्युलिप्सचा बहर बघून आपल्या ही कधीतरी असा बहर बघायला मिळाला पाहीजे असे वाटून गेले होते. पहिल्या नेदरलँड ट्रीपमध्ये ऑगस्टमध्ये गेलो असल्यामुळे हा बहर बघता आला नाही म्हणून रूखरुख लागली होती. साधारण स्प्रिंग सुरु झाला की दोन महिने हा बहर Keukenhof / क्युकेनहॉफमध्ये बघायाला मिळतो. ह्यावेळेस अगदी पक्कं ठरवले की जायचेच आणी लगेच झुतरमिअरस्थित मित्राला फोन केला आणी ट्युलिप्स गार्ड्न कधी उघडते हे विचारुन घेतले. २० मार्च ते १८ मे  पर्यंत ट्युलिप्सचा बहर सगळ्यांना बघता येईल असे तो म्हणाला. लगेच प्लान करुन टिकिट्स बुक केले आणी आता वेध लागले होते ट्युलिप्स बघण्याचे.
११ एप्रिलच्या शुक्रवारी दुपारचे विमान होते त्याप्रमाणे मँचेस्टर एअरपोर्ट्वर आलो आणी विमानासाठी गेटपाशी जाऊन बसलो.
.
.
काही मिनिटात आमचे विमान लागले आणी आम्ही अ‍ॅमस्टरडॅम - स्किपोलला रवाना झालो. एअरपोर्टला उतरुन बाहेर पडलो आणी समोरचं आय अ‍ॅमस्टरडॅमचा लोगो दिसला आणी मग काय एक फोटो तो बनता है :)
.
एअरपोर्टच्या आवारातही छोट्या-छोट्या कुंड्यामध्ये ट्युलिप्सची फुलं लावली होती, वातावरण ही छान होतं , संध्याकाळचे साडेचार वाजले होते , कोवळं ऊन, हलका वारा आणी समोर ट्युलिप्स.
.
मित्र घ्यायला आला, तसेच पटापट सामान गाडीत टाकून थेट अ‍ॅमस्टरडॅम सिटी सेंटरला गेलो, मागेच सिटी, संग्राहलय बघून झाले होते त्यामुळे फारसे ते न करता दाम स्क्वेअरला थोडा टाईमपास केला, तेथूनच थोडे पूढे अ‍ॅमस्टरडॅमच्या "प्रसिध्द" गल्ल्यांमध्ये फेर-फटका मारला ;) आताशी सडकून भूक लागली होती म्हणून माओजमधल्या फलाफालची खादाडी केली. तिकडचा मालक हा पंजाबी आहे, त्याच्याबरोबर थोड्या गप्पा मारून आम्ही पुन्हा भट्कायला निघालो.
.
फलाफल
.
सिटीत थोडे फिरून आम्ही झुतरमिअरला मित्राच्या घरी आलो, जेवून झोपी गेलो. दुसर्‍या दिवशी Keukenhof / क्युकेनहॉफला निघायचे होते.
सकाळी लवकरचं नाश्ता करून आम्ही निघालो. Keukenhof / क्युकेनहॉफ हे लिस्स (Lisse) ह्या शहरात आहे. येथे जायला हार्लेम, स्किपोल ट्रेन स्टेशन्वरुन बसेस आहेत. Keukenhof / क्युकेनहॉफला गार्डन ऑफ युरोप असे म्हटले जाते. तेथे ट्युलिप्ससोबत, डॅफोडिल्स, हायसिंथ, ब्लूबेल्स, नारसीसस फुलांची ही लागवड केली जाते.
जसे जसे आम्ही Keukenhof / क्युकेनहॉफ जवळ येऊ लागलो तसे तसे ट्राफिक आम्हाला लागू लागले. बर्‍याच देशातून असंख्य पर्यटक येथे हा बहर बगायला येतात. तिथे सायकलवरून ही फिरता येतं, पार्कमध्ये सायकल नेण्यास बंदी आहे, त्यासाठी त्यांनी वेगळे सायकल रूट्स बनवले आहेत, तसेच बोटींग करुन ही तुम्ही ह्या ट्युलिप्सचे सौंदर्य बघू शकता. काही गाईडेडे टुअर्सदेखील आहे. Keukenhof / क्युकेनहॉफबद्दल माहिती तुम्हाला इथे मिळेल.
हळू-हळू करत आम्ही एकदाचे तेथे पोहोचलो. गाडी पार्क करुन थेट तिकिटघर गाठले. इतकी गर्दी असूनही तिकिटाला भली मोठी रांग अशी नव्हती. पटापट तिकिटं काढून आम्ही आत गेलो.
.
आता येताच विविध रंगानी सजलेली ती बाग, ते सुंदर ट्युलिप्सचे बल्ब बघून खरचं दिल ट्युलिप ट्युलिप हो गया :)
.
'Jan Bos' - ह्या फुलांचा सौम्य सुवास दरवळत राहतो.
.
टोरंटो
.
ट्युलिपा क्युबेक
.
हार्ट्स डिलाईट
.
विविध रंगाचे ट्युलिप्स
.
.
.
रेड इम्प्रेशन
.
Purissima
.
युडिथ लेस्टर
.
युनायटेड स्टेट्स
.
ऑरेंज एम्परर
.
ऑलम्पीक फ्लेम
.
.
.
मध्ये थोडं थांबून Oranje Nassau Pavilion मध्ये मस्तं फिश एन चिप्स खाल्लं आणी पुढची भटकंती सुरु केली.
.
.
.
.
.
.
.
लेडी जेन
.
फायर विंग्स
.
.
निघता निघता आम्ही Poffertjes house मधले डच पॅनकेक्सवर ताव मारला. मस्तं लुसलुशीत, बटर व पिठीसाखर भरुभूरलेले गरमा-गरम पॅनकेक्स अहाहा!! हेवन!!
.
तेथून आम्ही जवळचं असलेल्या ट्युलिप्स फिल्ड्वर गेलो, खरं तर हे प्रायव्हेट फिल्ड्स आहेत पण काहीजणं तेथे फोटो काढायची परवानगी देतात. मनसोक्तं फोटो काढले अगदी यश चोप्रा स्टाईल ;)
.
.
.
दिवस कसा गेला समजले नाही, आम्ही इथे सहा तास होतो चक्क!! कॅमेरात सगळे सौंदर्य किल्क करुन ही समाधान मिळत नव्हते, मेमरी कार्ड भरले पण मन काही भरत नव्हते. जितके साठवून घेऊ तितके घेण्याचा प्रयत्न करत होते.
ट्युलिप बघून शांत, प्रसन्न वाटत होते. स्वप्नपुर्ती झाली. आता निघायचीही वेळ झाली होती आणी दूर तक निघाहों में हे गुल खिले हुए म्हणत आम्ही Keukenhof / क्युकेनहॉफचा निरोप घेतला.
आता जायचे होते वॉलंदाम आणी झान्सेस स्कांन्सला.
क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राणीच्या देशात - बेकवेल

माझी इटलीची भ्रमणगाथा ( भाग -९)

माझी इटलीची भ्रमणगाथा (भाग २)